फेसबुक फ्रेंड सर्कल टीम एका आईला मदत करण्यासाठी बेळगावपासून सुमारे 85 किमी अंतरावर असलेल्या हुक्केरी राशिंग तालुक्यात पोहचले . येथील रहिवासी असलेले बाबुराव चौगुले यांचे ४ दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .
त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी २ लहान मुले आहेत . सदर कुटुंब अत्यंत गरीब आणि हाताच्या पोटावर राबणारे असल्याने त्यांना मदत करण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कलने पुढाकार घेतला आहे .
या टीमला व्हॉट्सअॅपवर कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांकडून एक पत्र मिळाले .त्यामुळे आज फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने गावात पोहोचून किमान ३ महिने पुरेल इतका रेशन साठा किराणा सामान देऊ केले.
सदर मदत संतोष दरेकर अवधूत तुडयेकर, निरज शहा, डॉ रोहित जोशी, काका हवाल आणि मधु मेणसे यांच्यातर्फ़े देण्यात आली . या कुटुंबियांना तत्काळ मदतीबद्दल गावकऱ्यांनी या टीमचे आभार मानले आणि त्यांना आशीर्वाद दिला .