आज मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव नगरी या मराठी प्रांतात करताना विशेष आनंद झाला. सहकाराचा उद्देश उपेक्षित लोकांना संघटित आणि समर्थ करणे हा आहे. बँकेने ह्या उद्देशाने सातत्याने कार्य करून लौकिक मिळवला आहे.असे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.ते मराठा बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते .
यावेळी पुढे ते म्हणाले कोणत्याही बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे की नाही याची नाडी परीक्षा म्हणजे त्या बँकेने दिलेले कर्ज व त्याच्या वसुलीचा ताळमेळ दर्शवणारा एनपीए निर्देशांक असतो. बँकेचा एनपीए शून्य असणे हे बँकेचे अर्थकारण उत्तम चालले असल्याचे द्योतक आहे.
संचालक मंडळ व संस्थापकांनी घालून दिलेला आदर्श यांना याचे श्रेय जाते. अनुभव, ज्ञान व दृष्टी याची जाण ठेवून जुन्या संचालकांचा सत्कार इथे केला गेला, याचे मला कौतुक वाटते असे मनोगत त्यानी त्यांनी यावेळी व्यक्त केले .