बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे.असे गौरवोद्गार चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी काढले.
चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताई च्या माध्यमातून विनामूल्य सेवा देणे असो, बेवारस व्यक्तींवर अंत्यसंस्कार असोत विजय मोरे यांनी आदर्श काम केले आहे. त्यांचा हा आदर्श आपण सर्वानी घेतला पाहिजे असे विचार त्यांनी याप्रसंगी मांडले .
या कार्यक्रमाला माजी राज्य मंत्री भरमु सुबराव पाटील, शिवसेना नेते संग्रामसिंह कुपेकर, गोपाळराव पाटील तसेच चंदगड तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.