स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना १६ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावला भेट दिली होती.तीन दिवस स्वामींचे वास्तव्य रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी होते.याचे औचित्य साधून रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी ५. ३० ते ८. ३० या वेळेत राष्ट्रीय कीर्तीचे कलाकार दामोदर रामदासी यांच्या मर्यादा पुरुषोत्तम राम या हिंदी एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विवेकानंद स्मारक येथे जनतेने भेट देऊन स्वामी विवेकानंदाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूला नागरिकांनी भेट देऊन स्वामीजींना वंदन करून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. गुरुवार दि. १६ रोजी
दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे करण्यात आले आहे.
रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे. येथे स्वामी विवेकानंदांचे तीन दिवस वास्तव्य होते. स्वामी विवेकानंदानी वास्तव्य केलेल्या पवित्र वास्तुमध्ये रामकृष्ण मिशन आश्रमाने स्वामी विवेकानंद स्मारक उभारले आहे.येथे स्वामीजीनी वापरलेली काठी, आरसा, पलंग जतन करून ठेवण्यात आले आहे.स्वामी विवेकानंदाच्या जीवनाचे दर्शन घडवणारे चित्रांचे प्रदर्शन स्मारकात उभारण्यात आले आहे.
रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन
