मर्कंटाइल सोसायटीने आपल्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्याचा उपक्रम जो अनेक वर्ष चालू ठेवला आहे तो कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे” असे विचार आर्किटेक्ट मोनिका सावंत यांनी बोलताना व्यक्त केले.
मर्कंटाइल सोसायटीच्या वतीने शनिवारी सायंकाळी युनियन जिमखाना येथे झालेल्या “कौतुक संध्या” कार्यक्रमास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय मोरे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. संजय मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी संस्थेच्या सभासदांच्या दहावी, बारावी, पदवी परीक्षेतील गुणवंतना तसेच खेळ आणि विशेष गुणवत्तापात्रांना पाहुणे व चेअरमन यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका शारदा सावंत, संचालक जयपाल ठकाई व सदाशिव कोळी यांच्यासह कर्मचारी वर्ग सभासद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तेजस्विनी तमुचे यांनी केले.
यावेळी संस्थेचे आभार व्यक्त करणारी बाळकृष्ण पाटील,कुमारी तृषा पाटील आणि नेगीनहाळ यांची भाषणे झाली.