जिल्हा पंचायत सभागृहात माजी जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांचा निरोप समारंभ आणि नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिलेल्या बेळगावातील सेवे प्रकरणी अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले. जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी कोरोना महापूर या काळात सामान्य नागरिकांपर्यंत अप्रत्यक्षरीत्या मदत देऊ केली असल्याचे त्यांच्या कौतुक आणि निरोप समारंभाप्रसंगी सांगण्यात आले.
तसेच यावेळी त्यांचा पुष्पहार शाल भेटवस्तू आणि फळे देऊन सपत्निक त्यांना निरोप देण्यात आला. त्यानंतर नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले
यावेळी नुतन जिल्हाधिकारी यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्यात काम करताना मला आनंद होत आहे मागील अनुभवाच्या आधारे मी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगाय्या य जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन व्ही एच पोलीस उपाधीक्षक अशोक दुडगूंट्टी यांच्यासह बेळगाव शहरातील सर्व अधिकारी जिल्हा पंचायत कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.