जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सm यांना आज सकाळी माजी महापौर सरिता पाटील यांनी वडगाव येथे भेट घेतली.यावेळी त्यांनी बेळगाव सह सीमाभागातील मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज साठी असलेला कोटा वाढवून द्यावा अशी विनंती शरद पवारांना केली .
यावेळी 1990 च्या दशकापासून सात जागा मेडिकल साठी सीमाभागातील लोकांसाठी ठेवलेल्या आहेत .पण आता लोकसंख्या ही वाढलेली आहे व मेडिकल कॉलेजची संख्याही वाढलेली आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सोयीचा लाभ मिळावा यासाठी या जागा दुपटीने वाढवाव्यात अशी मागणी माजी महापौर सरिता पाटील यांनी केली.
त्याला तात्काळ त् पवार साहेबांनी संमती दिली व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय अमित देशमुख साहेब यांना फोन करून प्रस्ताव तयार करण्याच्या संदर्भात चर्चा केली .त्याच बरोबर आरोग्य शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब यांना देखील त्यांनी फोन वरून चर्चा करून या गोष्टीची कल्पना दिली.
तसेच ज्योती कॉलेज येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये पवार साहेबांनी या गोष्टीला दुजोरा देत बेळगावकरांना ठोस असे आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि लवकरात लवकर या जाग्या वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या संदर्भात पावले उचलली आहेत असे सांगितले.