कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेळगाव येथील ७०० एकर जमीन हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, जी सध्या त्यांच्या मंत्रालयाच्या ताब्यात आहे.
राज्य सरकारला आयटी पार्कसाठी ही जागा हवी असून, बेळगावमध्ये ते विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे .बुधवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
“बेळगावातील सुमारे 700 एकर गवताळ प्रदेश संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. सदर जमीन राज्य सरकारची आहे. ही जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे बोम्माई यांनी सांगितले.
शहरात आयटी पार्कसाठी राज्य सरकारला या जमिनीची गरज आहे.त्यामुळे आम्ही संरक्षण मंत्रालयाला जमीन देण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच याबाबत केंद्रीय मंत्र्याने या विषयावर संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेतील,” अशी महिती ही बोम्मई यांनी यावेळी दिली .