आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त बेळगावच्या जायंट्स ग्रुप बेळगाव परिवाराच्यावतीने काल बुधवारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारत नगर शहापूर लक्ष्मी रोड येथील गणेश मंदिरात अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विमल श्रीमंत मोहिनीकर लक्ष्मी राजाराम भादवणकर सुनंदा हरीश दिवटे व शोभा पांडुरंग लाटूकर यांना मातृदिन सन्मान बहाल करण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमाला जायंट्स ग्रुप बेळगाव परिवारचे अध्यक्ष श्रीधन मलिक जेन्ट्स फेडरेशन माजी अध्यक्ष राजू माळवदे यांच्यासह जायंट्स ग्रुप परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.