सध्या बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे.या आंब्यामध्ये वेगवेगळ्या जाती असून त्याचे वेगवेगळे दरही आहेत. सध्या आंब्यांचा सिझन असला तरी आणि आंब्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात असली तरी आंब्याचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत.
दर जरी गगनाला भिडले असले तरी खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या करिता वाटेल त्या दराने आंब्याची खरेदी करत आहेत. सध्या हापूस आंब्याचा दर सातशे ते आठशे रुपये प्रति डझन असा आहे.
तर तोतापुरी पायरी यासह अनेक जातीचे आंबे पाचशे ते चारशे रुपये डझन याप्रमाणे विक्री करण्यात येत आहेत. त्यामुळे फळांचा राजा आंब्याला यंदा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
सध्या बाजारात सिंदूर आंबा 950 रुपये प्रति डझन नाटी ज्वारी 400 रुपये प्रति डझन हापूस आंबा पंधराशे रुपये प्रति डझन तोतापुरी चारशे ते पाचशे रुपये प्रति डझन यासह लोणच्याच्या आंब्याचे दर देखील पाचशे ते पंधराशे रुपये प्रति डझन अशा प्रमाणे आहेत.