कोनेवाडी गावामध्ये गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे सदर मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून काल मंदिराचे चौकट पूजन करण्यात आले.
यावेळी सुवासिनी महिला आणि युवतींनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी मिरवणूक झाल्यानंतर मंदिराचे चौकट पूजन ग्रामपंचायत सदस्य मोनाप्पा नारायण पाटील व गजानन आप्पाना भातकांडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या मिरवणुकीमध्ये समस्त कोनेवाडी गावातील नागरिक महिला वर्ग आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या