वैशाख अमावस्येनिमित्त पाटील गल्लीतील शनि मंदिरतर्फे सोमवारी (ता. ३०) मंदिरात अभिषेक, पूजा, तीर्थ- प्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. पूजा, प्रसादासाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी दत्तप्रसाद ज्योतिष कार्यालय, मारुती गल्ली किंवा मंदिराच्या कार्यालयाशी सकाळी ८.३० ते १० किंवा सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत संपर्क साधावा, असे मंदिराचे पुजारी आनंद अध्यापक यांनी कळविले आहे.