बेळगाव पिरनवाडी येथील विश्व भारत सेवा समिती संचालित कर्मवीर विद्यामंदीर हायस्कूलच्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेची आदर्श विद्यार्थिनी कु रोहीनी युवराजसिंग रजपूत हिने एकूण 605 (96.80%) गूण घेऊन शाळेत आजपर्यंतचा नविन उच्चांक गाठला, त्याचप्रमाणे द्वितीय कु. पायल गजानन वासुदेव हिने 570 (91-20%) तृतीयक्र कु श्रुती सुरेश पवार हिने व कु. राधिका स. कोरवी 513 (82.08), चतुर्थ कु·माला म. किंदरी 497(179.72%) आणि पाचवा क्र. कु. गायत्री म. वाडीकर 493 (78.88%) गुण घेऊन उतीर्ण झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.आर. कडगावकर व सर्व सहशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
कर्मवीर विद्यामंदीर हायस्कूल पिरनवाडी शाळेच्या मुलींचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
By Akshata Naik
Previous articleशनैश्चर जयंतीनिमित्त ३० रोजी कार्यक्रम
Next articleआठवड्याभरातच बारावी पेपर तपासणीला प्रारंभ