बारावीच्या पेपर तपासणी ला आज पासून सुरुवात झाली आहे. शहरातील आठ केंद्रांवर बारावी पेपर तपासणीच्या कामकाजाला आज पासून सुरुवात झाली असून लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.
बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आज दिनांक 24 मे पासून शहरातील आठ केंद्रांवर पेपर तपासले जात आहे. यासाठी संबंधित प्राध्यापकांना पूर्वसूचना व नियमावली देण्यात आली आहे.
तसेच पेपर तपासणी प्रक्रिया पारदर्शक राहण्यासाठी बेळगाव पदवीपूर्व शिक्षण विभाग सज्ज झाला असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
गेल्या महिन्याभरात पूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात म्हणजे 18 मे रोजी बारावीची परीक्षा संपली. त्यानंतर आठवड्याभरा नंतरच पेपर तपासणीला सुरुवात झाली आहे.
ज्याप्रमाणे दहावीचा निकाल नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा उशीर आणि लागला त्याचप्रकारे बारावीच्या निकालात कोणताही प्रकारचा गोंधळ होऊ नये याकरिता आजपासूनच बारावीच्या पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.