भवानीनगर येथील एका कुटुंबियांना लग्नासाठी मदत देण्यात आली आहे. फेसबुक फ्रेंड सर्कल च्या वतीने सदर मदत देण्यात आली आहे.
भवानीनगर टिळकवाडी येथील एका आजीच्या नातवंडाचे लग्न आज आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने फेसबुक फ्रेंड सर्कल ने या कुटुंबीयांना लग्नासाठी लागणारे सामान नातवंडे साठी लागणारी साडी आजोबांसाठी लागणारे कपडे तसेच मंगळसूत्र वाट्या यासह घराचे रंगकाम करण्याचे कार्य फेसबुक फ्रेंड सर्कल ने हाती घेऊन ते पूर्ण केले आहे.
येथील आजी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता स्वयंपाकी आणि मोलकरणी म्हणून काम करते त.सेच तिचा पती आंधळा आहे. अशा परिस्थितीत आपल्या नातवंडांचे लग्न कशा प्रकारे करायचे हा प्रश्न आधी समोर उभा टाकला होता मात्र फेसबूक फ्रेंड सर्कल च्या वतीने आजीला लग्न कार्यासाठी लागणारी सर्व मदत देण्यात आली आहे.
यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर माजी महापौर विजय मोरे ऑलन मोरे अवधूत तुडयेकर पुनम होनगेकर अमर कोल्हापुरे सम्राट पाटील गोपाळ घोंगडी हे सर्व आज लग्नकार्यात सहभागी होऊन कुटुंबाला पाठिंबा दिला आहे.