नुतन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी कर्नाटक पश्चिम शिक्षकांचा निवडणूक मतमोजणी केंद्राची पाहणी केली. तावडे त्यांनी शहरातील ज्योती महाविद्यालयाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी येथील उपस्थित अधिकाऱ्यांना सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेत या ठिकाणी प्रत्येक मोजणी केंद्रात 14 टेबल्स बसवावेत याशिवाय स्टॉगरूम बसविण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे निर्देश दिले .
याप्रसंगी त्यांनी मीडिया सेंटरच्या स्थापनेचा आढावा घेतला याशिवाय मतमोजणी केंद्राची नाही तर पोस्टल मतदान कक्ष माहिती कक्ष निरीक्षक कक्ष त्यासह आदी कक्षांची माहिती घेतली.त्याच बरोबर येथील सर्व कक्षांची तपासणी करून जागेची माहिती देखील घेतली तसेच या ठिकाणी सीपीएड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्याची सूचना देखील केली.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव कुमार होलिकाई पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी प्रांताधिकारी रवींद्र कलिंगन्नावर निवडणूक शाखेच्या तहसीलदार सारिका शेट्टी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी उपस्थित होते.