बेळगावची कन्या आणि समाजसेविका कांचन शहापूरकर यांना श्री अम्मा प्रतिष्ठान आणि थोर समाजसेवक तसेच गरीबांचे कैवारी श्रीयुत बाळासाहेब कल्लाप्पा उद्घगट्टी यांच्या हस्ते राज्यस्तरीय कर्नाटक रत्न प्रशस्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कांचन शहापूरकर या लग्न समारंभामध्ये फेटे बांधण्याचे कार्य करतात निस्त्या एक उद्योग क्षेत्रातील व्यक्ती देखील असून समाजसेविका असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय कर्नाटक रत्न प्रशस्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम 16 जून रोजी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला त्यांच्या हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.