भविष्यनिर्वाह कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी वेबिनार घेण्यात येत आहे. कोरोना काळात या कार्यालयाने कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेबिनारचे माध्यम निवडले गेले आहे . त्यामुळे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी होणाऱ्या वेबिनारमध्ये सहभागी होऊन कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी – मांडाव्यात . या वेबिनारच्या लिंक्स व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्या जातील, असे कळविण्यात आले आहे.
भविष्यनिर्वाह कार्यालयातर्फे वेबिनारचे आयोजन
By Akshata Naik
Previous articleकांचन शहापूरकर यांना राज्यस्तरीय कर्नाटक रत्न प्रशस्ती पुरस्कार
Next articleहुतात्मा दिनी राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती