रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे.महावीर चींनाप्पा सुपण्णावर वय 60 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात असताना त्यांनी महावीर यांचा मृतदेह झाडाला लटकताना पाहिला. यावेळी त्यांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर ही बातमी अनगोळ भागात वार्यासारखी पसरली.
सदर मृत्यू झालेल्या महावीर यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून मृतदेह शवचिकित्सा साठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.