भरधाव कंटेनरने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना तवंदी घाट येथील हॉटेल अमर समोर आज सकाळी दहा वाजता घडली.
या अपघातात चंपा ताई मगदूम व 80 छाया पाटील वय 55 आदगोंडा पाटील वय 60 आणि महेश पाटील वय 23 या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की निपाणी तालुक्यातील बोरगाव वाडी येथील रहिवासी असलेल्या पाटील कुटुंबीय येथील ब्रह्मनाथ मंगल कार्यालय येथे मुलीचे लग्न कार्यासाठी आले होते यावेळी पाटील कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी हा अपघात इतका भयानक होता की कार मधील सर्व जणांचा चेंदामेंदा झालेला पाहायला मिळाला.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती या सदर लग्नातील मुलीचा भाऊ काकू काका आजी या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच निपाणी मंडल पोलिस स्थानकाचे निरीक्षक सांगली शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसूर अनिल कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.