बेळगावचे माजी उपमहापौर शनागेश मंडोळकर यांनी काल दिनांक 26 मे 2022 रोजी उत्तरचे पीडब्यूडी एई श्रीमती बेन्नी मॅडम आणि जगदीश पुरोहित यांच्यासमवेत बेळगाव तलावाच्या समस्या आणि तलावाच्या विकासाबाबत सर्वेक्षण केले होते.
यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची माहिती नागेश मंडोळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली .तसेच येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना नालाचे पाणी घरात शिरूनये याकरिता योग्य उपाय योजना राबविण्याची विनंती केली .
तसेच जवळपासच्या विकासाबाबत आणि विविध परिसरातील समस्यांविषयांनी चर्चा केली .यावेळी बेन्नी यांनी आपण लवकरात लवकर येथील विकास काम सुरू करू अशी ग्वाही दिली.