येत्या 27 जून पासून दहावीच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ होणार आहे. तसेच सदर परीक्षा 4 जुलै पर्यंत चालणार असून पहिला पेपर हा 27 जून रोजी विज्ञान राज्यशास्त्र आणि कर्नाटक संगीत असणार आहे. तर 28 जून रोजी प्रथम भाषा कन्नड तेलुगू हिंदी मराठी तमिळ उर्दू इंग्रजी व संस्कृत असणार आहे.
तसेच 29 जून रोजी द्वितीय भाषा इंग्रजी कन्नड,30 जून रोजी समाजविज्ञान, 1 जुलै रोजी तृतीय भाषा हिंदी कन्नड इंग्रजी अरेबिक उर्दू संस्कृत कोकणी तुळू असणार असून दिनांक 4 जुलै रोजी गणिताच्या पेपर ने दहावीच्या पुरवणी परीक्षेची सांगता होणार आहे.
ज्याप्रमाणे मुख्य परीक्षा पार पडली त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षाही घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
तसेच जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांना त्यांना पुन्हा एकदा या परीक्षेला बसण्याकरिता तीन ते चार आठवड्यांचा अवधी मिळाला आहे.