विद्यार्थ्यांना बस पास करिता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.गेल्या दोन आठवड्यांपूर्वी शाळांना प्रारंभ झाला असून बस ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पास मिळण्याकरिता एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.
तोपर्यंत विद्यार्थ्यांनी 30 जून पर्यंत आपल्या जुनाच पास बस प्रवास करिता वापरावा अशी माहिती परिवहन मंडळाने दिली आहे. बस पास प्रक्रिया ऑनलाइन असल्याने बस पास वितरणास विलंब होणार असल्याने परिवहन खात्याने विद्यार्थ्यांना ही सवलत दिली आहे.
तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बस पास नसला तरी शाळा अथवा कॉलेज मध्ये फी भरून घेतलेली पावती प्रवासाकरीता दाखवावी असेही सांगण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन अर्ज केलेली प्रत परिवहन मंडळाकडे दिल्यानंतर ऑनलाईन अर्ज व दिलेल्या माहितीची खातरजमा करून विद्यार्थ्यांना बस पास वितरित करण्यात येणार आहे.