1986साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बेळगुंदी येथे हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना येत्या 6 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे.
बेळगुंदी येथील भाऊ चव्हाण कलाप्पा उचगावकर मारुती गावडे यांचा पोलिसांच्या गोळीबारात बळी गेला होता त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आली आहे
बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व सीमा बांधवांनी मोठ्या संख्येने हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.