सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती मेळावा मराठा लाईट इन्फंट्री च्या वतीने पार पडणार आहे तसेच सदर भरती प्रक्रिया माजी सैनिकांसाठी असून येत्या 14 जून आणि 15 जून रोजी सदर भरती मेळावा होणार आहे.
मात्र माजी सैनिकांना या भरती मेळाव्यात सहभागी होण्याकरिता नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत. उमेदवाराने मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेवा केलेली नसावी.
तसेच उमेदवाराने सेवेतून निवृत्त होताना त्याला अनुकरणीय अथवा अतिउत्तम शेरा मिळलेला असावा त्याचबरोबर मागील सेवा काळात दोन पेक्षा अधिक लाल शाईचा शेरा देण्यात आलेला नसावा. त्याच बरोबर लष्करी सेवेत लष्करी कायदा कलम 35 36 37 व 41 (2)अन्वये शिक्षा झालेली नसावी. या सर्व नियम व अटी मान्य असलेल्या माजी सैनिकांना या सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदासाठी या भरती मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.