राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीदिनी
सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही
दि. 26 जून 2022 रोजी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या मराठी माध्यम दहावी ( एस. एस. एल. सी.) परीक्षेत बेळगाव शहर विभाग आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येकी रोख रुपये 5,000/- व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .
तसेच इतर विभागांतील प्रत्येक शाळेत सर्वप्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख रुपये 1,000/- व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी सदर विभागांतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनीचे नाव शाळेच्या लेटर हेड्वर सही शिक्क्यानिशी दि. 19 जून 2022 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नेताजी जाधव आणि मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे