तालुक्यात आणि शहरात रविवारी आणि सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती तर्फे उद्या रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळी पाच वाजता रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे बैठक होणार आहे.
तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दिनांक 20 जून रोजी दुपारी दोन वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल स्कूल गोवावेस येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्यामुळे या दोन्ही बैठकीला सीमा बांधातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.