आज आणि उद्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिरज लोंढा द्रुपदरीकरण्याच्या कामासाठी विद्युत वाहिन्या स्थलांतर करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने तुम्मुर गुद्दी पंपहाऊस परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे परिणामी तयाला आशयाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण होणार आहे.
शहरातील रस्त्याच्या कामाकरिता खोदाई करताना तीन ठिकाणी जलवाहिनी चे नुकसान झाले आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे . त्यामुळे आज आणि उद्या होणारा शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे
शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा व्यत्यय निर्माण होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.