गेल्या चार दिवसापासून चाललेल्या वकिलांच्या आंदोलनाला काल सायंकाळी पूर्णविराम मिळाला आहे. आमदार अनिल बेनके आणि आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नामुळे वकिलांनी आपले उपोषण मागे घेतलेआहे. तसेच नारळ पाणी पिऊन बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी आपले उपोषण सोडले आहे
कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग खंडपीठ बेळगाव मध्येच राहण्याकरिता वकिलांनी हे आंदोलन आणि उपोषण छेडले होते. यावेळी आमदार यांनी मध्यस्थी करून गुलबर्गा येथे हे खंडपीठ उभे न करता बेळगाव मध्येच उभे राहील अशी ग्वाही बार असोसिएशनला दिली. त्यामुळे वकिलांनी काल नारळ पाणी पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.