जुन्या पी. बी. रोडवर दोघा मटका बुकींना शहापूर
पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून २ हजार १५० रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत. जुन्या पी. बी. रोडवर मटका सुरू असल्याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून अश्फाक दादापीर सनदी (वय ३९) राहणार तांबिटगार गल्ली, होसूर, प्रज्वल ऊर्फ जोतिबा शंकर किटवाडकर (वय २८) राहणार संभाजी गल्ली, महाद्वार रोड यांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा कलम ७८(३) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे



