सुलधाळ रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली एका अनोळखीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे ४५ ते ५० वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ५ फूट ४ इंच उंची, गहू वर्ण, अंगाने अनोळखीचा मृतदेह सडपातळ असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर चौकडा हाफ टी-शर्ट व काळी पँट परिधान केली आहे रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली असावी, असा संशय आहे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सबंधितानी ०८३१-२४०५२७३ या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोनीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
सुलधाळ रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली सापडून अनोळखी ठार
By Akshata Naik
Previous articleजुन्या पी. बी. रोडवर दोघा मटका बुकींना अटक



