ऊस तोडणीसाठी मजूर व साहित्य घेऊन चाललेला ट्रक उलटून दहाजण जखमी झाले. खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी-पारिश्वाड रस्त्यावर हा अपघात झाला. जिल्हा रुग्णालयात उपचार करुन जखमींना घरी पाठविण्यात आले आहे
जमुनाबाई रमेश भुहिजी (वय ४३), सुमिता रत्नसिंग खन्नोजी (वय २२), दुर्गासिंग सोनू दवर (वय ५२), रमेश गुजरसिंग (वय ४८), सुनील दुर्गासिंग बोरेला (वय ८), रामपाल
साहिलसिंग खन्नोजी (वय ४४), सोनूबाई सोळंकी (वय ५३), महेश चव्हाण (वय ७४), सुमेरसिंग खन्नोजी (वय ६४), प्रताप सोळंकी (वय ५६) अशी जखमींची नावे आहेत. सर्व ऊसतोड मजूर महाराष्ट्रातून आले होते. खानापूर तालुक्यात ऊसतोड करण्यासाठी जात असताना हा अपघाता घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून सुदैवानेच या घटनेत जीवितहानी टळली आहे. घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली आहे



