लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार दि. ४ रोजी होणाऱ्या पौर्णिमा यात्रेसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी ठिकाणांहून भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.आज महायज्ञ मोठ्या उत्साहात पार पडला.तर भंडाराच्या उधळीत उदो ग आई उदो असा जय शोष करीत मिरवणूक पार पडली
यल्लम्मा देवीचे निवासस्थान असलेल्या हरलकट्टी येथून ज्येष्ठांनी साड्या, ब्लाउज, बांगड्या, हळद आणि केशर आणले आणि धार्मिक विधी केले. लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
यावर्षी तब्बल तीन लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. दर्शनासाठी डोंगरावर मंगळवारपासूनच भाविकांची गर्दी वाढली आहे. यात्रेनिमित्त होणारी गर्दी
पाहून मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप तसेच दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाविकांना मंदिराबाहेर देवीचे दर्शन व्हावे यासाठी दोन ठिकाणी भव्य दोन एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत.
४० छोटे तर पाच मोठे जलकुंभ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.



