बेळगाव : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी समृद्धी गुणवंत पाटील के सेट परीक्षेत वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण होत यश मिळवले आहे.
समृद्धी ही सध्या गोगटे कॉलेजमधून एम कॉम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. मराठी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांची ती कन्या आहे. दहावी, बारावी,बी कॉम आणि एम कॉम या सर्व परीक्षेतून 90 टक्केहून अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.



