ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, समाजसेवक शिवाजी कागणीकर यांना नुकताच राणी चन्नम्मा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सर्व लोकसेवा फाउंडेशन तर्फे शनिवारी दिनांक 29 रोजी सत्कार करण्यात आला.
वृक्ष लागवड आणि रोजगार हमी योजनेमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल पर्यावरण रक्षणासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे नुकताच पदवी प्रदान सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते शिवाजी कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे आज सकाळी सर्व लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यांच्या प्रेरणेमुळे पर्यावरण संरक्षणाचे काम अधिक जोमाने होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवाजी कागणीकर यांनी हिरेमठ त्यांच्या समाजसेवेचे विशेष कौतुक केले.
यावेळी भावकू कंग्राळकर, वसंत सनदी आदी उपस्थित होते.
सर्व लोकसेवा फाउंडेशन तर्फे डॉ. शिवाजी कागणीकर यांचा सत्कार



