No menu items!
Monday, December 23, 2024

थोड्याच वेळात निकाल जाहीर

Must read

कर्नाटक PUC द्वितीय वर्षाचा निकाल 2022 आज 18 जून 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे . पूर्व विद्यापीठ परीक्षा मंडळ, कर्नाटक karresults.nic.in आणि pue.kar.nic.in या अधिकृत वेबसाइटवर सकाळी 11:30 वाजता निकाल जाहीर करेल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी आज त्यांचा PUC निकाल 2022 पाहू शकणार आहेत

यावर्षी 6 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या PUC निकालाची वाट पाहत आहेत. 2021 मध्ये, महामारीची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द करण्यात आली. 2020 मध्ये, लॉकडाऊनमुळे निकालाला उशीर झाला आणि 14 जुलै 2022 रोजी जाहीर झाला. यावर्षी, बोर्ड सुमारे 4 आठवड्यांच्या कालावधीत निकाल जाहीर करत आहे.
कर्नाटक 2nd PUC परीक्षा 22 एप्रिल 2022 ते 18 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी जाहीर केले होते की निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

त्यानुसार आज PUC बोर्डाच्या कार्यालयाकडून थेट अपडेट्स येथे उपलब्ध केले जातील. यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी, टॉपर्स आणि इतर माहितीचा समावेश असेल. 2020 आणि 2021 मध्ये बोर्डाने कोणत्याही टॉपर्सची घोषणा केली नाही.मात्र आता टॉपर्सची घोषणा होण्याची शक्यता आहे .थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!