कर्नाटकातील बारावी अर्थात पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल आज जाहीर झाला असून या परीक्षेत 61. 88 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी बेंगलोर येथील पी यु सी बोर्ड मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बारावीचा शेवटचा पेपर 18 जून रोजी झाला होता. तसेच राज्यभरातील 1076 केंद्रावर सदर परीक्षा झाली होती त्यानंतर महिन्याभरातच पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
बारावीचा निकाल पदवीपूर्व खात्याच्या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलवरून एसएमएस करून आपला निकाल पाहता येणार आहे त्याकरिता KAR12- स्पेस – नोंदणी संख्या टाईप करून 56 26 त्या नंबर वर एस एम एस करून आपला निकाल पाहता येणार आहे. तसेच https://www.karresults.nic.in या संकेत स्थळावर देखील बारावीचा निकाल उपलब्ध असून नोंदणी संख्या साइटवर समाविष्ट करून आपल्याला निकाल पाहता येणार आहे.