अग्नीपथ योजनेच्या विरोधात शहरात विविध संघटनांकडून निदर्शने होण्याची शक्यता असल्याने शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरातील मुख्य माझ्याबरोबरच येथील रेल्वेस्थानकावर देखील पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
तसेच आज सकाळपासूनच रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात अग्निपथ या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.
चन्नम्मा चौक अशोक सर्कल रेल्वे स्टेशन कॅन्टोन्मेंट परिसर यासह शहराच्या मुख्य आणि संवेदनशील भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिकडे पहावे तिकडे पोलीस अशी परिस्थिती सध्या शहराची झाली असून अग्निपथच्या विरोधात कोणताही अनर्थ किंवा निदर्शने होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.