धारवाड उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश..!
कुवेंपू नगरमध्ये सात वर्षांपूर्वी एका महिलेची आणि दोन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीची धारवाड उच्च न्यायालयाने अनैतिकतेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
कुवेंपू नगर येथे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रवीण एस भट्ट आणि ३७ वर्षीय रीना राकेश मालगट्टी यांच्यात अनैतिक संबंध होते. याच प्रकरणातून प्रवीणने रीना आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली होती .
याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, यात आई रीना आणि दोन मुलांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते . साहित्या वय (5. ) आणि आदित्य वय (१२) अशी मृत्यु झालेल्या मुलांची नावे होती .
बेळगावच्या दुसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 16 एप्रिल 2018 रोजी प्रवीण भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, धारवाड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्याची 21 जून रोजी निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती के.एस. मुदगल आणि एमजीएस कमल यांनी निकाल दिला .
या निकालामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. कारण आई, मुलगा आणि मुलीची निर्घृण हत्ये प्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे .