गोगटे PUमहाविद्यालयात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.अमित एस.जाडे यांची सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आंध्र प्रदेश सेस्टोबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेकरिता तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली .
8 जुलै ते 10 जुलै दरम्यान आंध्र प्रदेशातील अनंतपुरम येथे पुरुष आणि महिलांसाठी दुसरी दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे.
यास्पर्धे डॉ. अमित एस. जाडे हे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्यांना सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.