बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील 25 हजार विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्याची योजना आखली असून याद्वारे यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण केले जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने सरकारने या शाळांमध्ये सायकल वितरणाचे निर्णय घेतला नव्हता. मात्र आता शाळा पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने यंदा 25 हजार विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण खात्याकडून सरकारी व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून ये-जा करण्याकरिता सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी सायकलींचा लाभ करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे