येथील शहरातील भुईकोट किल्ला आणि दुर्गामाता देवी मंदिराला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आज भेट दिली आणि या ठिकाणी असलेल्या देवीचे दर्शन घेतले.
त्यानंतर त्यांनी किल्ल्यातील प्राचीन कमल बस्ती ला देखील भेट दिली आणि या ठिकाणी असलेल्या तीर्थानकारांचे दर्शन घेऊन कमल बस्ती ची अधिक माहिती जाणून घेतली. तसेच याठिकाणी असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमला देखील भेट देऊन येथीलही माहिती घेतली .
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ खासदार मंगलांगळी आमदार अनिल बेनके जिल्हाधिकारी नितेश पाटील हे देखील उपस्थित होते.हे सर्वजण बसवण कुडची येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले असता या ठिकाणी भेट दिली.