येळ्ळूर खटल्याची सुनावणी पुन्हा महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे तारीख पे तारीख तारीख पे तारीख येत असल्याने या खटल्याची पुढील सुनावणी पुढेच जात आहे.
येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटवल्यानंतर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर निष्पाप जनतेवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्या खटल्याची सुनावणी आता न्यायालयात सुरू असून या सुनावणीदरम्यान हजर न झालेल्या हत्या होत असून अधिक कार्यकर्त्यांच्या नावाने वॉरंट बजाविण्यात आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते वॉरंट रीकॉल करून घेतले जात नाही.तोपर्यंत या खटल्याची सुनावणी करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या खटल्याची सुनावणी 29 जुलै पर्यंत ढकलण्यात आली आहे. जर सर्व कार्यकर्ते एकाच वेळी हजर झाल्यास या खटल्याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.