दहावीची पुरवणी परीक्षा 27 जून पासून सुरू झाली आहे.मात्र या परीक्षेला 175 विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याने पुरवणी परीक्षा घेऊन एक संधी दिली असताना सुद्धा 175 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले आहे.
दहावीच्या पुरवणी परीक्षेचा पेपर काल सुरळीत पार पडला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शिक्षण खात्याच्या वतीने सर्व ती खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी पहिला पेपर करिता 1106 विद्यार्थी उपस्थित होते.
28 मार्च 11 एप्रिल पर्यंत दहावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर त्याचा निकाल 20 मे रोजी लागला,तर आता 27 जून पासून पुरवणी परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा 14 केंद्रांवर घेण्यात येत असून पहिल्याच पेपरला 175 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे.