काल 120 किलोमीटर गतीने रेल्वे इंजिन बेळगाव सुलधाळ रेल्वे मार्गावर पळविण्यात आले.
येथील बेळगाव सूलधाळ या 27 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले असल्याने या मार्गाची स्पीड ट्रायल घेण्याकरिता येथून ताशी 120 किलोमीटर वेगाने इंजिन इंजिन पळविण्यात आले
नैऋत्य रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वेमार्गाच्या तपासणी करण्याकरिता काल पहिल्या टप्प्यातील स्पिड ट्रायल केली त्यानंतर आज सुद्धा उर्वरित ट्रायल घेतली जाणार आहे.
आज मंगळवार दिनांक 28 जून रोजी येथील रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण करण्यात आलेल्या मार्गावर दुसऱ्या टप्प्यातील स्पिड ट्रायल होणार असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.