राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने बजाविला आहे. त्यामुळे बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुख पदी असणारे लक्ष्मण निंबरगी यांच्या जागी आता संजय एम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून आता संजय एम पाटील हे काम पाहणार आहेत. आय ए एस अधिकारी संजय एम पाटील आधी बेंगलोर शहराच्या पश्चिम विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते. तर आता ते बेळगाव जिल्ह्याचे एसपी म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असणारे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची बेळगाव जिल्ह्यातील एसपी पदावरून अन्यत्र बदली करण्यात आली आहे.