आषाढी वारीनिमित्त सुळगा ते पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सुळगा यांच्या वतीने पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली आहे .आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पूजन व इतर पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष निर्मला कलखांबकर ,यल्लाप्पा कलखांबकर सागर सांगावकर, भागांना नरोटी ,आनंद तुपट बाळू पाटील ,महादेव कंग्राळकर ,विमल पाटील ,शांता चौगुले ,नारायण कदम ,अजित कलखांबकर, यल्लाप्पा कदम ,परशुराम कदम ,तुकाराम चौगुले ,नारायण कणबरकर ,लक्ष्मण पाटील ,मारुती चौगुले राजू पाटील, राजू पोटे, यल्लाप्पा चौगुले ,अध्यक्ष रवळू चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला .
यानंतर श्री माऊली रथाचे उद्घाटन माजी ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष विनय विलास कदम ,श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव तालुकाचे अध्यक्ष परशुराम तूप्पट यांच्या हस्ते पार पडला .त्यानंतर दिंडीची टाळ-मृदंग यांच्या गजरात सुरुवात झाली व दिंडी मार्गस्थ झाली .
यावेळी गावातील वारकरी बंधू-भगिनी भाविक भक्त बाळगोपाळ मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .तसेच देवस्की पंच कमिटी सदस्य, ग्रामपंचायत कमिटी विविध आर्थिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम तूप्पट व अजित कलखांबकर यांनी केले .