७१ रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ ही योजना सुरू केली आहे. याद्वारे स्थानिक उद्योगांना बाजारपेठ मिळणार आहे .या योजनेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले जात आहेत. स्थानिकांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.
येथील बेळगाव रेल्वेस्थानकावर शहापुरी साडी, कुंदा व कर्दंट यांची विक्री करता येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावयाचे आहेत. निवड करण्यात आलेल्या प्रत्येक विक्रेत्याकडून १५ दिवसांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्यांना एक स्टॉल दिला जाणार आहे त्यामध्ये त्यांना आपले साहित्य ठेवून त्याची विक्री करता येणार आहे. इच्छुकांनी ९७३१६६८९५९ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन नैऋत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे