कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरींग क्लिनीक बेळगांव यांच्या मार्फत डॉक्टर्सदिनाचे अवचीत्य साधून हे शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये कानाची श्रवण तपासणी, वाचा व भाषा अश्या प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या तपासण्या ऑडीओलॉजी विभागाचे तज्ञ ऑडीओलॉजीस्ट डॉ. नागनाथ गोंड तसेच राजेभाऊ राठोड हे करणार आहेत. हे शिबीर बेळगांव, चिक्कोडी व गोकाक या शहरांमध्ये भरवण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये ऐकू कमी येणाऱ्या समस्या सबंधीत कानाच्या वेगवेगळ्या तपासण्या अत्याधुनीक मशीनरीजच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. यामध्ये OAE, PTA, IMPEDANCE याप्रकारच्या तपासण्या ऑडीओलॉजिस्ट तज्ञा मार्फत करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये ज्या रुग्नांना ऐकण्यासंबंधी अतितीव्र श्रवणदोष आढळुन येइल, अश्या रुग्नांना नामांकीत कंपनीचे श्रवण यंत्र कमीतकमी दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये निवड झालेल्या सर्व रुग्नांना कानाच्या सर्वच प्रकारच्या तपासण्या निशुल्क करण्यात येणार आहेत. तसेच बोलण्याच्या समस्येवर वाचा उपचार तज्ञ यांच्याकडून वाचा व भाषा विकास या विषयी मुल्यांकन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीराला वाचा उपचार तज्ञ म्हणून स्वरुपा वरदापगोळ व सुजाता होसमनी ह्या पाहणार आहेत. हे शिबीर शुक्रवार, दिनांक 1 जुलै 2022 रोजी बेळगांव मधील क्लिनीक मध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. बेळगावातील क्लिनीक काकतीवेस रोडला असुन, प्रसाद मेडीकलच्या समोर आहे. चिक्कोडी येथील क्लिनीकमध्ये हे शिबीर दिनांक 3 जुलै 2022 रविवार या रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. हे क्लिनीक बस स्टँडच्या बाजूला असून, आर. डी. कॉलेजच्या समोर आहे. व तसेच गोकाक येथील क्लिनीक बस स्टँड रोडला असून, पुनर्वि ज्वेलर्सच्या बाजूला आहे. हे शिबीर दिनांक 4 जुलै 2022 सोमवार या रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त गरजू रुग्नांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी : 9492853815 व 8088559289 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे कळविले आहे