रियल इस्टेटच्या नावाखाली अनेकांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळण्याच्या घटना शहरात वाढल्या होत्या.त्यामुळे आज पहाटे कायदा आणि सुव्यवस्था चे डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडत टाकत तीन गुंडांच्या घरावर छापेमारी केली.तसेच त्यांच्या जवळून धारदार शस्त्र ही जप्त करण्यात आली आहेत.
बेळगावात अनेकांना धमकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली होती .बेळगावात याचे जाळे विणले गेले होते . त्यामुळे आज पोलिसांच्या नेतृत्वाखाली सदर गुंडांच्या घरांवर छापे टाकत त्यांच्या जवळील असलेले शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत
येथील खंजर गल्लीतील अलताफ सुभेदार वय 26, रुक्मिणी नगर येथील श्रीधर तलवार व 29 आणि महाद्वार रोड येथील विनय प्रधान वय 45 यांच्यासह आणखीन 26 जणांच्या घरावर धाड टाकण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी त्यांच्या जवळून तलवार चाकू जांभिया यासारखी धारदार शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
सदर कारवाई कायदा आणि सुव्यवस्थेची डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून शहरातील विविध गुंडांच्या ठिकाणावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 150 आणि पोलीस कर्मचारी या छापेमारीत सहभागी आहेत.